वाशिममधील नांदगाव येथील शेतक-यांनी सोमवारपासून (7 नोव्हेंबर) सुरू केलेले उपोषण आज दुस-या दिवशीदेखील सुरू आहे. शेतजमिनीचे बनावट दस्ताऐवज बनवल्याप्रकरणी मूळ दस्ताऐवज दुरुस्त करुन देणे, तसंच संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी शेतक-यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.