अकोला : पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांचेही हाल होतात.