औरंगाबाद - अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतुक शाखेने कात टाकली असून, ‘स्पीड गन’ बेदरकार वाहनांची वेगमर्यादा मापणार आहे. त्यास ऑनलाइन दंडात्मक पावत्या व कार्यवाही करणार आहेत. मुंबईनंतर औरंगाबाद शहरात ३ ‘स्पीड गन’ पहिल्यांदा आल्या आहेत. बीडबायपासवर पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली घाटे- घाडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.