Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुरी येथील शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती ह्यांनी चित्रपट पद्मावतीचा कीरिध करणाऱ्या राजपूत समाजाच्या आंदोलनकर्त्यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. आणि चित्रपटाच्या प्रदर्शना वर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले कि चित्रपट निर्मात्यांना कोणतीही धमकी दिलेली नाही. आम्ही फक्त सल्ला देत आहोत कि त्यांनी आपल्या चुका मान्य कराव्यात आणि माफी मागावी. जेणेकरून भविष्यात आपल्या इतिहासाशी कोणीही छेडछाड करायला कोणी धजावणार नाही. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी सुद्धा चित्रपटाचा विरोध केला आहे आणि त्यांनी भन्साळी ह्यांना अटक करण्याची सुद्धा मागणी केली आहे. उदयपूरच्या भिंडर राजघराण्याचे सदस्य आणि वल्लभनगर येथील आमदार रणधीरसिंघ भिंडर ह्यांनी काहीही झाले तरी राजस्थान मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही अशी धमकी दिली आहे .

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended