ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेते नेमबाज व सध्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धनसिंह राठोड यांनी भारताकडे शंभर उसेन बोल्ट घडवण्याची क्षमता असल्याचे मत व्यक्त केले आहे. ‘‘क्रीडा क्षेत्रातील प्रत्येकाने एकदिलाने काम केले तर बोल्टसारखा खेळाडू घडू शकतो. शालेय स्तरावर खेळाडू निवड चाचणी प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. साधारणपणे पाच फूट 11 इंचापेक्षा जास्त उंची असलेल्या मुले व मुलींची बास्केटबॉल किंवा व्हॉलिबॉलसारख्या खेळाकरिता निवड केली पाहिजे. वेगवान धावण्याची क्षमता असलेल्या मुला-मुलींना शंभर मीटर धावण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.’’राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाकरिता लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. एक वेळ काही राष्ट्रीय खुल्या स्पर्धाकरिता फारसे प्रेक्षक नसतात, मात्र शालेय स्पर्धाना भरपूर प्रेक्षक मिळतात. केंद्र शासनाने विविध नवीन योजना सुरू केल्या असून, त्याकरिता खासगी उद्योग संस्थांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या आर्थिक निधीचा योग्य रीतीने विनियोग होण्याची गरज आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews