जळगाव ः तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे ९० टक्के काम पुर्ण झाल्याने या महामार्गावर आजपासून वाहनाधारकांकडून ‘टोल’ वसुली सुरू झाली. अचानक सुरू झालेल्या टोल वसूलीमुळे अनेक वाहनधारकांनी गोंधळ केला. तर जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांना टोलमधून सुट द्यावी असाही अनेक वाहनधारकांनी धरला. दरम्यान काही युवकांनी आम्हाला टोलनाक्यावर नोकरी मिळावी अशी आग्रही मागणी करीत गर्दी केली होती.
#jalgaon #jalgaonnews #nashirabad #nashirabadtoll #nashirabadhighway