Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Karad: भाजप नेते किरीट सोमय्यांनी कराडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय...
ठाकरे सरकारनं ठोकशाही करून घोटाळे उघड करणाऱ्यालाच रोखण्याचा आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय...हसन मुश्रीफांनी 127 कोटींच्या मनी लॉन्डिंगबद्दल
हिशोब का दिला नाही असा सवालही सोमय्यांनी केलाय...मुश्रीफ आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? असा सवालही सोमय्यांनी केलाय..मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय...ब्रिक्स इंडिया या बेनामी कंपनीचे मालक हसन मुश्रीफांचे जावई असल्याचा आरोपही त्यांनी केलाय...दरम्यान, येत्या गुरुवारी पारनेर सहाकरी कारखान्याला भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय...रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या अलिबागमधील कोर्लाई गावातील जमिनीची येत्या सोमवारी पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय...तर जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय.
#kiritsomaiya #kiritsomaiyakarad #karadnews #uddhavthackeray #shivsena #bjp

Category

🗞
News
Comments

Recommended