Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#kolhapur #kolhapurnews #ambabaimandir #ambabai #ambabaikolhapur
कोल्हापूर-साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून संपूर्ण देशाला परिचित असलेल्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे.
अंबाबाई मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडतो.
यंदाच्या नवरात्रौत्सवाची सर्व तयारी आता पूर्ण झाली आहे.
यंदा मंदिराची सजावट महाराष्ट्रातील इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील ख्यातकीर्त एनर्जी इनकॉर्पोरेशनचे स्वप्निल हिडदुगी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मंदिराची यंदाची सजावट अतिशय सुंदर, आगळीवेगळी व लक्षवेधी झाली आहे.
सजावटीसाठी खास मुंबईतील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.
राहूल, सुयश आदी याकरिता विशेष परिश्रम घेत आहेत.
नवरात्रौत्सव काळात दिसणारी सजावट
'हट के' व्हावी यासाठी एनर्जीचे अनेक कलाकार कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
'गोशिमा'चे माजी अध्यक्ष दिवंगत सुभाष हिडदुगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची संपूर्ण सजावट विनामूल्य करण्यात आली आहे, अशी माहिती स्वप्निल हिडदुगी यांनी यावेळी दिली.

Category

🗞
News

Recommended