#hybridgrains #grains #nagaliwaan #nagali
सुरगाणा आदिवासी बहुल तालुक्यात पारंपरिक पद्धतीने नागलीचे पिक घेतले जाते. नागली हे आदिवासींचे प्रमुख अन्न मानले जाते.
नाचणी किंवा नागली ह्या धान्याला आदिवासी बोलीत 'कणसरी, देव असे म्हणतात.
आदिवासी भाषेत नागलीला नाचणी असेही म्हणतात. सुरगाणा तालुक्यात ४२७० हेक्टर क्षेत्रावर
नागलीचे उत्पन्न घेतले जाते.
जोंधळ्याच्या चवीची असणारी नाचणी (शास्त्रीय नाव - इल्युसाईन कोरॅकोना) म्हणजेच नागली हे तृणधान्य शरीरासाठी पौष्टिक समजले जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरच लोह,नायसिन,थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. नाचणीत असणाऱ्या कॅल्शियमच्या विपुल साठ्यामुळे खेळाडू,कष्टाचे काम करणारे,वाढत्या वयाची मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात.