#hybridgrains #grains #maharashtra #naturalgrains
"गावरान बियाणं, खणखणीत नाणं; हायब्रीड वाणं, बेचव खाणं". अगदी खरंय हायब्रीड च्या या जमान्यात गावरान हरवत चाललंय. हरितक्रांतीच्या पर्वात उत्पन्न वाढवण्याच्या सपाट्यात शेतकर्यांनी संकरीत (हायब्रीड) बियानांचा सर्रास वापर सुरु केला. त्यात पूर्वापार चालत आलेले नैसर्गिक बियाणे वापरणे बंद होऊ लागले. पण या संकरीत बाजरीची चव थोडीशी कडवट असल्याने काही शेतकरी आजही त्यांच्याजवळचे पारंपारिक बियाणे वापरुन स्वतःला खाण्यापुरती बाजरी पिकवतात. वाद ता चांदवड येथील नंदु देवरे व निमोण ता चांदवड येथील भास्कर देवरे हे शेतकरी त्यातलेच. रासायनिक शेती आणि हायब्रीड बियाणांमुळे आपल्या दैनंदिन आहारात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.हायब्रीड मुळे उत्पादन तर जास्त मिळतं मात्र आरोग्य चांगलं राहतं नसल्याची या दोन्ही शेतकऱ्यांची खात्री पटलीय. शेतीच्या नवीन पद्धतीमुळे आपल्या मातीत पूर्वापार येणाऱ्या पिकाचं वाणच नष्ट होण्याच्या मार्गावर गेलं होतं. हे गावरान वाण जपण ही काळाची गरज आहे.