Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#waluj #walujcompany #aurangabad #aurangabadnews
वाळूज (जि.औरंगाबाद) : औद्योगिक वसाहतीमधील एल-5 या प्लॉटवर पाल्स एबीइनब्हेव ही कंपनी आहे. येथे बिअरचे उत्पादक घेण्यात येते. या कंपनीत जवळजवळ शंभर कामगार असून या कामगारांना 55 हजार रुपयाच्या पुढे असा भरभक्कम पगार आहे. या कंपनीचे व्यवस्थापन व सिटु कामगार संघटनेत पुढील तीन वर्षासाठीचा वेतन करार यशस्वीरित्या होऊन कामगारांना 21 हजार 186 रुपयाची भरघोस पगारवाढ मिळाली. या पगारवाढीबरोबरच कामगारांना इतरही अनेक फायदे मिळणार आहेत. हा वेतनवाढीचा करार यशस्वी होताच कामगारांनी कंपनीच्या गेट समोर फटाक्याची आतषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष केला. दिवाळीच्या सुरुवातीलाच ही पगारवाढ मिळाल्याने या कंपनीच्या कामगारांमध्ये मोठा आनंद आहे. (व्हिडिओ : रामराव भराड)

Category

🗞
News
Comments

Recommended