Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#dhananjaymunde #jagdambaaai #mahurgad #nanded #nandednews
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे माहूरगडाच्या रेणूका दरबारात सपत्नीक हजेरी...

विजया दशमी च्या औचित्यावर नामदार मुंडेंनी आई रेणुका देवीचे सपत्नीक दर्शन!

सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार भगवान गडावर न जाता कुलदैवत आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावून सपत्नीक दर्शन घेतले.कोरोना ने जगात हाहाकार माजविला असून जगातील कोरोना आजार दूर करण्याचे साकडे आई रेणुका देवीला घातले.यावेळी रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,माहूर नगरपंचायत च्या नगराध्यक्षा शीतल जाधव,तालुका अध्यक्ष मेघराज जाधव,युवक अध्यक्ष मारोती रेकुलवार सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(साजीद खान,माहूर जिल्हा नांदेड)

Category

🗞
News

Recommended