राष्ट्रवादीच्या आमदाराचा करिष्मा; खंडाळा कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व | SakalMedia
लोणंद (सातारा) : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Khandala Sugar Factory Election) आज (ता. १९) झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या नेतृत्वाखालील बाळसिध्दनाथ संस्थापक शेतकरी सहकार पॅनल दारुण पराभवाच्या छायेखाली असून आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनल सर्व जागांवर विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. मतदारसंघात आमदार पाटलांच्या पॅनलनं विजय मिळवल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला. (व्हिडिओ : रमेश धायगुडे)
#NCP #MakrandPatil #KhandalaSugarFactoryElection #Lonand
Comments