Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर - दिवाळी पाडव्याला गुळ सौद्याचा दराने शेतकऱ्यांत उत्साह

कोल्हापूरचा गूळ देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या गुळ सौद्याकडे देशभरातील गुळ व्यापारी आणि शेतकऱ्यांचे लक्ष लागलेलं असतं. परंपरेप्रमाणे आज दिवाळीच्या पाडव्यादिवशी कोल्हापूरच्या बाजार समितीत गूळ सौद्यांना सुरूवात झाली. यावेळी व्यापारी आणि शेतकरी यांच्यात मोठा उत्साह दिसून आला होता. आज पहिल्याच दिवशी बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली. आज पहिल्याच दिवशी गुळाला 3400 ते 4300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता

#kolhapur #jaggery #farmers $esakal #sakalmedia

Category

🗞
News

Recommended