Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं परंतु, तरीदेखील राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली संपूर्ण बाजू त्यांच्यासमोर मांडली. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नका मनसे आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे असं आवाहन राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलं. राज ठाकरे यांच्या दरबारी आल्यावर न्याय मिळेल असा विश्‍वास एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

Category

🗞
News
Comments

Recommended