Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Kolhapur ; कोल्हापूर - सतेज पाटील बिनविरोध; महाडिकांची माघार ; पाहा व्हिडीओ

कोल्हापूर : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे आदेश दिल्ली येथून आल्यानंतर आज तात्काळ भाजप आघाडीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने पालकमंत्री सतेज पाटील हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही वेळातच अमित शहा यांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली.
#kolhapur #vidhanparishad#unopposed #mlamalmahadik #guardianministersatejpatil #bignews #esakal #sakalmedia

Category

🗞
News

Recommended