#ShivendraRaje #MumbaiGangster #BJP #NCP #Congress #ShashikantShinde #SataraNewsUpdates #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup
कुडाळ (सातारा) : हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत, गुंडगिरी जावळी तालुका चालू देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. सोनगाव (ता. जावळी) येथे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.