#dahivadi #satara #birds #birdssanctury #devapurlake #maantaluka #mandesh #
दहिवडी (सातारा) : युरोप (Europe), सायबेरिया, रशिया (Russia), हिमालय, तिबेट या भागातून परदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे माणदेशात (Mandesh) दाखल झाले असून, स्थलांतरित पक्ष्यांचा मेळाच माणदेशात भरला आहे. पुढील चार ते पाच महिने या पाहुण्यांचे या ठिकाणी वास्तव्य असेल. खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) येरळवाडी- मायणी समूह पक्षीसंवर्धन (Birds) राखीव क्षेत्रापासून ते माण तालुक्यातील (Maan Taluka) कुळकजाई, तसेच म्हसवडजवळील देवापूर तलावात (Devapur Lake) परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे.
(व्हिडिओ : रुपेश कदम)