मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेले अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. १६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांच्या १७ वा स्मृतिदिनी 'लक्ष्य कला मंच'ची स्थापना करण्यात आली. अभिनेत्री आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे यांनी या कला मंचाची स्थापना केली आहे. कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कासाठी 'लक्ष्य कला मंच' या संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या संस्थेत अभिनयासोबतच तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
#PriyaBerde #lakshmikantberde #artist