Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बीड जिल्ह्यात हिंदू देवस्थान, वक्फ बोर्डासह इतर इनामी जमिनी वठवण्यात आल्या आहेत. जवळपास हजार कोटींचा हा घोटाळा आहे. यात भाजपाचे आमदार सुरेश धस व त्यांच्या ताब्यात असलेली बँक, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांचा देखील सहभाग असल्याचा खळबजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे व शेख अब्दुल गणी यांनी केला होता. यावर सुरेश धस यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. खोटे आरोप करून बदनाम करु नका, असे ते म्हणाले आहेत. पाटोदा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Category

🗞
News

Recommended