Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
#SantosParabAttackCase #NarayanRane #MahavikasAghadi #MaharashtraTimes
संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे.नितेश राणेंवर कारवाईसाठी शिवसेना आग्रही असल्याचे दिसून येत आहे.नितेश राणेंच्या अटके संदर्भात नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.कणकवलीत काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे.खुद्द नारायण राणे यांनीच ही शक्यता व्यक्त केली आहे.या प्रकरणात नितेश राणेंना नाहक गोवलं जात असून हे आघाडी सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. तसेच या प्रकरणी नितेश राणेंविरोधात शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे

Category

🗞
News

Recommended