महाराष्ट्रात महिलांबाबत ठाकरे सरकार निवडक लोकांवरच कारवाई करत आहे. हे कुठे तरी थांबल पाहिजे. रश्मी ठाकरे किंवा किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल कुणी चुकीचे शब्द काढत असतील तर आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. ज्या पद्धतीने त्याच्यावर बोलले तर त्याची सरकार लगेच दखल घेतली परंतु अमृता फडणवीस याबच्याबद्दल विद्याताई खालच्या पद्धतीने टीका करतात पण त्याची दखल सरकार घेत नाही. त्यामुळे सर्वाना समान वागणूक सरकारने दिली पाहिजे. सर्वाना समान वागणूक मिळावी यासाठी महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहेत. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे.