भारतीय जनता पक्षाला यापूर्वी आम्ही मदत केली. परंतु त्यांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास तर केलाच; पण त्यांच्या आत्मसन्मानाला इजा पोचवली आहे. आता त्यांनी कितीही हिंदू-मुस्लिम असे राजकारण केले, तरी उपयोग नाही. राम मंदीर हा मुद्दा तर आता गैरलागू आहे, अशा शब्दांत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी भाजपवर घणाघात केला. बुढाना नजीकच्या शेतावर सकाळचे प्रतिनिधी संतोष शाळीग्राम यांनी नरेश टिकैत यांच्याशी संवाद साधला. नरेश हे राकेश टिकैत यांचे थोरले बंधू. राष्ट्रीय स्तरावर राकेश यांचे नाव गाजत असले, तरी स्थानिक राजकारणावर नरेश टिकैत यांची पकड आहे. या भागात त्यांना सन्मानाने चौधरी साहाब' म्हटले जाते. या मुलाखतीत त्यांनी भाजपवर टीका करताना ऊसाचा हमी भाव, वीज बिल आणि शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्राने शेतकऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला.
#upelections2022 #nareshtikait #upelections #bjp #farmersprotest #narendramodi #rajeshtikait