अलिगड मुस्लिम विद्यापीठ म्हटलं की इस्लामिक शिक्षण देणारे विद्यापीठ समजले जाते. पण शंभर वर्षांपासून प्रागतिक शिक्षण इथे दिले जाते. विशेष म्हणजे या विद्यापीठात मराठी भाषा विभाग आहे. तिथे मुस्लिमांसह हिंदी भाषिक विद्यार्थी संतसाहित्याचे धडे गिरवत आहेत. या विभागाचे प्रमुख डॉ. ताहेर पठाण हे आहेत. त्यांनीही संतसाहित्यावर पीएचडी केली आहे. मराठी विषयी स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्याबरोबरच विविध मराठी उपक्रमांच्या माध्यमातून या विभागाला त्यांनी वेगळी उंची मिळवून दिली आहे. या विभागात सध्या 250 विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत.
#aligadh #alimuslimuniversity #marathi #marathiliterature #dnyaneshwarmaharaj #sainttukaram