जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार ही भारताची ओळख २०१७-२१ या कालखंडातही कायम राहिली. मात्र, आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन दिल्यामुळे या काळात शस्त्रास्त्र आयातीत २१ टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूटने नोंदविले आहे. आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र हस्तांतरण २०२१ या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालाने आणखी कोणते मुद्दे अधोरेखित केले आहेत, चला पाहू या व्हिडीओ मधून.