Skip to playerSkip to main content
  • 10 minutes ago
नागपूर : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रांतून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या दमदार अभिनयाने आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या मनावर अमिट छाप सोडणाऱ्या नाना पाटेकर यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत धक्कादायक, वेदनादायक घटना घडली आहे. कधीच न भरून निघणारी पोकळी मराठी माणसाच्या जीवनात निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांच्याशी एका कार्यक्रमाच्या विषयाने बोलणं झालं होतं. मी गोव्यात आहे, तिथे माझं चित्रीकरण आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी होऊ असं शब्दही त्यांनी दिला होता. मराठी माणसासाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी उभे राहणारे नाना आज आपल्यातून निघून गेले. एक प्रचंड उंचीचा कलावंत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचा वलय आणि स्थान निर्माण करणारा कलावंत, जगाला गवसणी घालण्याची क्षमता असलेला कलावंत आज आमच्यातून निघून गेला, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं आशिष शेलार म्हणाले.

Category

🗞
News
Transcript
00:00Thank you so much for joining us.
00:56Thank you so much for joining us.

Recommended