मुंबई - आयआयटी मुंबईचा (IIT Bombay) द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेससह विविध विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. साहिल वाकोडेचे कुटुंबीय देखील न्यायासाठी आंदोलन करत आहेत. आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.या प्रकरणावरून मुंबईतील आझाद मैदान आणि आयआयटी कॅम्पसबाहेर सातत्याने निदर्शने सुरू आहेत.साहिलच्या पालकांनी सुरू ठेवलेल्या आंदोलनाला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या आहेत. साहिलला न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी दुपारी आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला होता.27902030_thumbnail_16x9_iit bombay protes