वाशिम - ऐतिहासिक, पौराणिक महत्व प्राप्त असलेले शहरातील प्राचीन तलाव एप्रिलच्या प्रारंभीच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. ज्या तलावाच्या पाण्यात मानवी अस्थींचे विसर्जन करतात, तो पद्मतीर्थ यंदा कोरडाठाण्ण पडला असून देवतलावातील पाणीपातळीही कमालीची खालावली आहे.