Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अकोला - प्रत्येक पाऊल इतिहास घडवेल अन् फुटबॉलचं वेड नसानसात ठसेल...अशी नारेबाजी करत अकोलेकर फुटबॉलप्रेमींनी गुरूवारी शहरात फुटबॉल रोड शोच्या माध्यमातून खेळाचा प्रचार केला. फिफाच्यावतीने भारतातील सहा राज्यांमध्ये ९ ते २५ ऑक्टोबर याकालावधीत ७ वर्षाखालील मुलांसाठी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील काही सामने महाराष्ट्रातील नवी मुंबईत होणार आहेत. याकरिता महाराष्ट्र शासन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याकरिता ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ ही योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आरोग्य आणि आनंदासाठी फुटबॉल प्रत्येक नागरिकांनी खेळावा, हा संदेश देण्यासाठी फुटबॉल रोड शोचे आयोजन केले होते.

Category

🗞
News

Recommended