Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची तुळजाभवानी देवी छत्रपतीशिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रुपात पूजा बांधण्यात आली.
गुरुवारी अष्टमीच्या जागराचा होम झाल्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता अंबाबाईचा गाभारा दर्शनासाठी उघडण्यात आला. त्यानंतर देवीचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची तुळजाभवानी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. तुळजापूरची आदिमाया अंबा भवानी ही अष्टभूजा दुर्गा स्वरुप आहे. सिंहवाहिनी असलेल्या या देवीची हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजाभवानी देवीवर प्रचंड श्रद्धा होती. देवीची भक्ती ही त्यांच्या स्वराज्य संस्थापनेचे प्रेरणास्थान होती. शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापनाच्या कार्यात आशिर्वाद म्हणून भवानीमातेने तलवार प्रसादरुपाने दिली. हीच तलवार शिवाजी महाराजांची प्रसिद्ध भवानी तलवार म्हणून ओळखली जाते. ही पूजा पराग ठाणेकर यांनी बांधली.

Category

🗞
News

Recommended