Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
इंटरनेट या माध्यमाचा अनेकजण गैरवापर करत असताना या माध्यमाचा चांगल्याप्रकारे उपयोगही होताना दिसतो. नुकताच याचा प्रत्यय आला असून फेसबुकच्या एका पोस्टमुळे एका कर्करोग झालेल्या रुग्णाला 25 लाखांची मदत मिळाली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरुन गुजरातमधील कर्करोग झालेल्या मुलाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली होती. सोशल मीडियावर अशाप्रकारच्या पोस्ट आल्यावर साहाजिकच रुग्णाला सहानुभूती दाखवली जाते. एखादेवेळी मदतीचा हातही पुढे येतो. मात्र मूळचा गुजरातचा असणाऱ्या ऋषी नावाच्या तरुणाला कर्करोगावरील उपचारांसाठी नेटवरुन थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 25 लाखांची मदत मिळाली आहे, तीही अवघ्या 15 तासांत.कर्करोगाच्या उपचारांसाठी जास्त प्रमाणात पैसे लागतात. ऋषीच्या कुटुंबाकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याच्या वडिलांना महिना 15 हजार वेतन मिळते. त्यातूनही त्यांनी ऋषीच्या उच्चशिक्षणासाठी 13 लाख रुपये वाचवले. एमबीए करुन चांगली नोकरी करायचे त्याचे स्वप्न होते. पण अचानक कर्करोग उद्भवल्याने हे सगळे पैसे उपचारात खर्च झाले. मात्र इंटरनेटवरील एका आवाहनातून त्याला मिळालेली रक्कम त्याच्या उपचारांसाठी वापरली जाणार आहे. त्याला दुर्मीळ प्रकारचा कर्करोग झा

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended