Pune's Smart City Reality: 64 Public Toilets Shut Down

पुणे शहरात 'स्मार्ट सिटी'च्या गप्पा मारल्या जात असल्या तरी जमिनीवरची परिस्थिती काही वेगळीच आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सुमारे १३०० सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी ६४ स्वच्छतागृहे सध्या बंद आहेत, तर २८ स्वच्छतागृहे पूर्णपणे मोडकळीस आली आहेत. गेल्या दोन वर्षांत पालिकेने एकही नवीन स्वच्छतागृह उभारलेले नाही, ज्यामुळे पुणेकरांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः हडपसर आणि सिंहगड रस्ता परिसरात ही समस्या अधिक गंभीर आहे. पालिकेचा १०० अत्याधुनिक स्वच्छतागृहांचा ४० कोटींचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पहा आमचा हा विशेष रिपोर्ट.

#PuneNews #PMC #PunePublicToilets #SmartCityPune #PuneMunicipalCorporation #PublicHealth #PuneInfrastructure #LokmatPune #Sanitation #WomenSafety #PuneDevelopment #CivicIssues #MaharashtraNews #PuneUpdates #Hygiene

Category

🗞
News

Recommended