Skip to playerSkip to main content
  • 14 minutes ago
पुणे - पुण्याची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून लाडक्या गणरायाच्या दर्शनासाठी हजारो लोक विविध मंडळांना भेट देत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनालादेखील मोठी गर्दी होत असून अनेक मान्यवर बाप्पाच्या दर्शनाला येत आहेत. असे असताना केरळमधील नादब्रम्ह कलावेधी या संस्थेच्या वतीनं आज सकाळी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर 'चंडा ताल' हा वाद्य प्रकार गणपतीला सादर करण्यात आला.  याच्या ताल वादनानं मंदिरातील वातावरण मंत्रमुग्ध आणि प्रसन्न  झाले. हे वाद्य फक्त देवाच्या समोर वाजवण्यास परवानगी असते, अशी आख्यायिका आहे. गणेशभक्तांसमोर येणाऱ्या भाविकांना या वादनानं आनंददायी ऊर्जा मिळाली. चंडा ताल हा या वादनाचा प्रकार आहे. हे तालावर वाजणारे वाद्य आहे, असे सांगितलं जाते.  याच नादब्रम्ह कलावेदी संस्थेच्या वतीनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर केरळचे पारंपरिक वाद्य वाद्य चंडा मेळमचे वादन करण्यात आले. गेली 10 वर्षे नादब्रम्ह कलावेदी संस्था हे सादरीकरण करत आहे.

Category

🗞
News
Transcript
00:00I
Comments

Recommended