मुंबई - भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार रईस शेख यांनी निवडणूक आयोगाने एस.आय.आर प्रक्रियेमध्ये मोठा घोळ केला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी ते म्हणाले की, भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये एसआयआर प्रक्रियेपूर्वी 3,76,138 मतदार होते. या प्रक्रियेत तब्बल 1,84,716 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. एकूण 49 टक्के नावे वगळण्यात आली आहे. मतचोरी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी तक्रार नोंदवली असून बेकायदा पद्धतीने वगळण्यात आलेली मतदान यांची नावे पुनर स्थापित करावी अशी मागणी यावेळी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आमदार रईस शेख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआर प्रक्रिया दरम्यान कशा प्रकारचे मत चोरी झाली आहे? या संदर्भात त्यांनी सादरीकरण केले.