नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ॲड. अभिजितजी वंजारी यांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष नागपुरात पाहायला मिळत आहे. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने देवडिया काँग्रेस भवनसमोर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.