पुणे - राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दहा महिने पूर्ण झाले असून या विमान अपघाताच्या संदर्भात सीआयडीकडून तपास सुरू असून अजित दादांच्या विमान अपघाताच्या नंतर सातत्याने हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचं सांगत आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आज ट्विट करत अजित दादांच्या अपघात घातपातमागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण असं म्हणत एका मफलरचा फोटो टाकून येत्या सोमवारी मुंबईत या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन याबाबत त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. असं असताना पुण्यातील डेक्कन परिसरात अजित दादांच्या अपघात घातपातमागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? मफलरचा फोटो लावत बॅनरबाजी करण्यात आली आहे. नेमकं या मफलरच्या मागे कोण नेता आहे त्याचा अजितदादांच्या अपघाताची काय संबंध आहे या संदर्भातील उत्तर आता येत्या सोमवारीच आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मात्र असं असलं तरी पुण्यात लावण्यात आलेल्या या बॅनरबाजीची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.