Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
विचारांचे खरं शास्त्र काय असते हे आपल्याला खरंतर शोधण्याची गरज नसते. कारण ते शास्त्र आपल्याच हातामध्ये असते. विचारांचे शास्त्र म्हणजे आपण ज्या पद्धतीने विचार करतो किंवा कृती करतो. विचारांची प्रतिक्रिया ही माणसाच्या कृतीतून होत असते. लहान बाळ जन्माला आले की त्याचे आई-वडील सतत त्या बाळाच्या भविष्यासंबंधीत विचार करू लागतात. आपल्या मुलाचे मोठेपणी कसे होईल याची चिंता त्यांना सारखी भेडसावत असते. आपण कोणतीही कृती करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये असंख्य चांगले आणि वाईट विचार हे येत असतात. त्यामुळे चांगले विचार घेऊन जर आपण समाजामध्ये आपले नाणे खणखणीत वाजवण्यास सुरुवात केली तर विचारांची प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होते. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचारांचे शास्त्र काय ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended