२ हजार रुपयांचा हिरा 50 लाखांना विकल्याचा आरोप नागपुरातील ज्वेलर्सनी केला आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीने अनेकांना गंडा घातल्याचं समोर येत आहे. थोडी-थोडकी नव्हे, तर मूळ किमतीच्या अडीच हजार पट किमतीने हिऱ्यांची विक्री केल्याचं उघड झालं आहे. बेल्जियमच्या बाजारातून हिरे आणून जयपूरच्या पॅलेसमध्ये प्रदर्शन मांडणारा नीरव मोदी. पण हाच नीरव मोदी एक नंबरचा फ्रॉड असल्याचा दावा त्याच्याच माजी कर्मचाऱ्यानं केला आहे. कधीकाळी नीरवचा मामा मेहुल चोक्सीच्या 'गीतांजली ब्रॅन्ड'मध्ये माजी व्यवस्थापकीय संचालक असलेल्या संतोष श्रीवास्तव यांनी हा आरोप केला आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews