नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रात्री साडेनऊ वाजता अचानक भेट दिली. आरोग्य केंद्रात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई आणि बदलीचे आदेश त्यांनी दिले. तसेच १०२ रुग्णवाहिका कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरण्याबाबत परिपत्रक काढूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अधिकाऱ्यांना खडसावले.