बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे यांची निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते, तर युगेंद्र पवार यांच्या पॅनेलनेही आव्हान दिले होते. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बारामतीच्या राजकारणात विशेष चर्चेचा विषय ठरली होती. आता अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीतून कारखान्याच्या सत्तेची नवी समीकरणं स्पष्ट झाली आहेत.
Comments