पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विकास कामाच्या निमित्ताने वृक्ष तोड होताना पाहायला मिळत आहे. नुकताच भीमाशंकर येथे झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भात वृक्षप्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. राज्यभर याचे मोठ्या प्रमाणात पडसाद पाहायला मिळाले. असं असताना, 'झाडे लावा, झाडे जगवा' याचा संदेश देत ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ (Actor Jackie Shroff) यांनी आज पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान (Chhatrapati Sambhaji Udyan Pune) येथे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की, हिट जास्त झाली असून आपल्या मुलांसाठी तसेच मुलांच्या भविष्यासाठी झाडे लावले पाहिजे. मी वृक्षतोड करत नाही. तर तुम्हीच वृक्षतोड करता, असं यावेळी त्यांनी सांगितलं.