Skip to playerSkip to main content
  • 12 minutes ago
सोलापूर (चिंचोली) : ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत राज्य कामगार विमा योजना (ESIS) च्या सेवा दवाखाना, चिंचोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले. वैद्यकीय प्रशासन अधिकारी (AMO), कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित माळी यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश देणाऱ्या या शिबिराला कामगार विमाधारक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 99 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे उद्घाटन सोलापूर औद्योगिक संघटनेचे उपाध्यक्ष सूत्रांवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. डॉ. अजित माळी यांच्या पुढाकाराने तसेच सेवा दवाखाना, चिंचोली येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.सिद्धेश्वर रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा मुख्य उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी मदत करणे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती करणे हा होता. कामगार विमाधारकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या सामाजिक कार्याला मोलाचे योगदान दिले. सेवा दवाखाना, चिंचोली येथील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने व समन्वयाने काम करत शिबिराच्या यशस्वितेसाठी मोलाचा वाटा उचलला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला.शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

Category

🗞
News
Transcript
00:00I am ma seva.
00:02This is my partner.
00:04The only thing I did is I had to take care of my life.
00:08I came to these two years ago.
00:12This is my partner,
00:20I am one of the best friends,
00:22family,
00:24and other friends.
00:55Thank you very much.
00:59Thank you very much.

Recommended